या मेघावर त्या मेघाची, ही लखलखणारी खुण
रुसल्यानंतर हळु वेच तु, आभाळमुठीतुन उन…!!
स्मरणयुगांचे सुन्न पहारे असतील येथले मागे
कुणी या चाफ्याच्याखाली, कुणी त्या शपथांवर जागे..!!
तळहातावर घे हलका तु, शुभ्र पिसांचा श्वास
हलकी फुंकर, मिटल्या डोळा पंख लागले भास..!!
मग तु वा-यावर अन मागावर पदरसावल्या पांघर
आभाळ उचलते उरलीसुरली पिसे उन्हाची भरभर…!!
तु गेल्यावर, या काठाला मुद्दाम सुचतसे पाणी
ओंजळभरुन तुला पाहता अलगद निसटती गाणी..!!

No comments:
Post a Comment