*॥ चाळीतला पाऊस ॥*

चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा

छप्परावर आदळून तो किती जोराने
पडतोय याचा अंदाज यायचा
दाराला प्लॅसटीक लावून ओघळणा-या
पावळांना अडवण्यात आनंद मिळायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

शाळेची तयारी करताना तो नसायचा
घरातून बाहेर पडला की नेमका हजर व्हायचा
दप्तर भिजवायचा... पुस्तकांना भिजवून स्टोव्हवरील भांड्यावर त्यांना उतानी पाडायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

वारा आला की टिव्हीवरील दूरदर्शनच्या
कार्यक्रमांना फुल स्टाॅप दयायचा
मग बाप माझा खांद्यांवर घेऊन मला
अॅटींना हलवायला सांगायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

मग कुठून तरी तो टिपटिप
करून घरात गळायचा
त्या खाली एखादं भांड ठेवून
त्यातच त्याला साचवायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

गटारातल पाणी वाढवून
तो मोरीत शिरायचा
आईची चीडचीड सुरू झाली
की निमूटपणे मागे परतायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

गांडूळ ही जमिनीतून
घराच्या कोप-यात शिरायचा
मग मीठ टाकून त्याच्या
अंगावरील वेदना अनुभवायच्या
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

साचलेल्या चिखलात
तो पोरांना लोळवायचा
हातात शीग घेऊन मातीत
खूपसून खेळायला लावायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा...

उकिरड्याचा त्रास व्हायचा
पण तरीही पाऊस हवाहवासा वाटायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा...

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !
म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

एका मुलीचा बापच ही कविता समजू शकतो.. dedicated to all father's................

🌸माझी चिऊ🌸

अंधुक नजरेवरचा चष्मा सांभाळत,
अडगळीत सापडली एक बाहुली ;
हो हीच ती , हीलाच सतत सोबत ठेवायची
माझी चिऊ लाडली ।

मला हीच बाहुली हवी म्हणुन किती आदळआपट केली तिनं;
'पप्पा पप्पा'म्हणत जीवनाला खरा अर्थ दिला तिनं ।

ती जन्माला आली
तेव्हां मी भानावर आलो ;
आतापर्यंत उनाड मी
कळलें मला मी बाप झालो ।

रांगत रांगत तिनं अख्ख
घर काबीज केलं ;
खळंभर घराला
घरपण तेव्हां आलं ।

यायचो कामावरुन थकुनभागुन तेव्हां पळत येवून बिलगायची;
रात्री आईजवळुन ऊठुण
हळुच कुशीत माझ्या शिरायची ।

चेपुन द्यायची अंग
हात डोक्यावरुन फिरवायची;
आंघोळीला बसलो की
साबण पाठीला चोळायची ।

आईनंतर तिच झाली माझी आई
हट्ट करुन करुन वाढायची;
नको नको चिऊ म्हणताही
घास प्रेमानं भरवायची ।

तब्बेत सांभाळा पप्पा म्हणत
औषध वेळेवर द्यायची ;
तडपत्या उन्हात वाटायचा आधार तिचा,
ती सावली मायेची वाटायची ।

मूठभर वाळू घ्यावी हातात
अन बघता बघता जावी निसटुन;
तसेच क्षणही गेले
निघुन माझ्या हातुन ।

चिऊ माझी केव्हा झाली मोठी
कळालेच नाही;
घरात सर्वांनाच झाली
तिची लगीन घाई ।

चिमणाराजा आला
त्यानं गायीली गोडगोड गाणी ;
सोडुन माझी बाग चिऊराणी
गेली दुरच्या रानी ।

हुंदके देत रडली किती जातांना,
मायही तीची रडली, ओक्साबोक्सी रडली भावंडं
काळजाची खिल्पी उडली ।

मी मात्र उभा स्थितप्रज्ञासारखा
कर्तव्य पुर्ण करुन .........
पण माझ्या मनाचाही महामेरु ढासळला ,जेव्हां चिऊ गेली माझ्या समोरुन ........।

जाता जाता मात्र म्हणाली ,
सांगा ना बाबा ,
आम्हांलाच का ही शिक्षा ;
देतो बाप आपल्या मुलीला ताब्यात परक्याच्या,
सहज द्यावी जसी भिक्षा ।

अशी कशी ही रीत बाबा ,
मुलीला सर्वांपासुन तोडते ;
आईबापांची तोडुन नाळ ,
इतरांशी नाते जोडते ।

सांगा ना बाबा ,असे गप्प का,
सांगा ना एकदा
पुन्हा ;
कोणी काढली ही रीत ,
मुलगी असणे हाच का आमचा गुन्हा ।........
..................................
आजही अडगळीतली खेळणी तिची ,
छातीसी धरुण रडतो ;
नाही मिळत ऊत्तर माझ्या चिऊच्या प्रश्नाचं ,
का बाप कन्यादान करतो .....
का 😪😪😪😪
कन्यादान करतो......???????????????

🌸🌸🌸🙏🏽🌸🌸🌸

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
... मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत..

ज्याने रचना केली त्याला  सलाम👍👍👍🙏👌👌👌

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?

कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई

फक्त हिमतीने लढ👊🏻

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुद्दलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं

माझी ही एक मैत्रीण होती,

माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..
मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग
का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..
बागेतली फुले तीला आवडायच्या आधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने लाडावून बागडायची… तिच्यासोबत
चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…
अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस
असायची..
एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना, शांत रहा म्हणून सांगत होतो…
तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..
तुझी दृष्टी होऊन मला, तुझं व्हायचं आहे, तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

प्रेमाला प्रेम समजणारी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
.
चश्मेबद्दुर .. खुबसुरतनसली तरी,
चारचौघीत उठुन दिसणारी असावी
.
गालीबची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी
.
यश-राज पिक्चरची हिरोईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी
.
बागेतल्या फ़ुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण आंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी
.
हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी
.
ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्याना हळुवार जपणारी असावी
.
ओळख असुन सुध्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी
.
केव्हातरी कुठेतरी ती भरभरुन व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपीत मग डोळ्यानीच सांगणारी असावी
.
थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फ़ुगण्यात मज्जा असावी
.
हसतांना गोबर्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पडण्याची मग माझी रीतच व्हावी
.
ईवल्याश्या नाकावर राग घेउन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मीठीत
रडणारी असावी
.
चोरुन चोरुन भेटायला येणारी असावी
हातात हात घालुन मग सगळ्यांसमोर
फ़िरणारी असावी
.
तीच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असावी
सुख आणि दुखात सदा दोघांची साथ असावी
.
जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फ़ुलवणारी असावी
.
आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी
.
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
.
तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरुप होऊन जळतांना इतरांना प्रकाश देणारी असावी.

भेटत ती पण नाही,भेटत मी पण नाही....

भेटत ती पण नाही,
भेटत मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला पटत नाही.
.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे....
.
समजत ती पण नाही,
रागवत मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
.
बघत ती पण नाही,
थांबत मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....
.
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत ती पण नाही,
सांगत मी पण नाही.......

आपलं साधं सोप्पं जगावं

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

दिलखुलास हसावं
न लाजता रडावं |

राग आला तर चिडावं
झालं-गेलं वेळीच सोडावं |

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं
रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) |

कोणी नडलाच तर बिनधास्त तोडावं
अडलेल्यांना झटकन सोडवावं !

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं
मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं |

चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं
घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं |

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

पै पै कमवायला वणवण फिरावं
तरीही मित्रांच्या पार्टीचं बिल हक्कानी भरावं |

हरामखोरांना पुरून उरावं
मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं 
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं |

सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
त्या परमेश्वराचं कौतुक जरूर करावं |

शेवटी साधं सोप्पं आयुष्य      आपलं साधं सोप्पं जगावं