Showing posts with label Bhau Bahin Kavita. Show all posts
Showing posts with label Bhau Bahin Kavita. Show all posts

Ek Bahin

प्रत्येकाला एक बहिण असावी .

मोठी लहान शांत
खोडकर
कशीही असावी
पण एक बहिण असावी .

मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी ,

लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी .

मोठी असल्यास गुपचूप
आपल्या पाॅकेट मध्ये पैसे
ठेवणारी .

लहान
असल्यास
चुपचाप काढून घेणारी .

लहान असो वा मोठी ,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर
कान
ओढणारी .

लहान
असल्यास
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.

लहान असो वा मोठी आपल्याला
एक
बहिण आसावी .

आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक
मारणारी
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास प्रत्येक
महिन्याला नवा शर्ट
आणणारी ,

लहान असल्यास
प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी .

ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत
असली तरीही तितक्याच
ओढीने
राखी पसंत
करून आणणारी .
एक बहिण
प्रत्येकाला असावी .

कठीण प्रसंगी खंबीर राहील
स्त्री शक्तीच ती ,
स्वतःपेक्षा हि जास्त
आपल्यावर प्रेम
करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी......!

आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश
वाचवा ।
भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा...

बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात,
याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली
वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा... कवीचे नाव न बदलता !
माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ
सांग ना तुला
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ
नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
राखी कोणत्या पत्त्यावर देऊ..