Showing posts with label अशी ती.... Show all posts
Showing posts with label अशी ती.... Show all posts

फक्त एकदाचं....

फक्त एकदाचं तुला मनसोक्त हसताना पहायचयं
निदान त्यासाठी तरी मला जोकर बनुन

तुझयासमोर यायचयं
फक्त एकदाचं तुझया मनातलं सारं काही जाणुन
घ्यायचयं
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन
तासनतास बसायचयं
फक्त एकदाचं तुझया मऊशार केसातुन हात
फिरवायचायं
निदान
त्यासाठी तरी एखादा गजरा तुझया केसात
लावयचायं
फक्त एकदाचं तुला माझयासाठी बेचैन
होताना पहायचयं
निदान
त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा
जायचयं
फक्त एकदाचं तुला अनिवार रडताना पहायचयं
निदान त्यासाठी तरी मला एकदा खोटं खोटं
मरायचयं....

मी कुठे म्हणालो परी मिळावी..!

मी कुठे म्हणालो "परी" मिळावी..
एवढंच की जरा "बरी" मिळावी..
प्रयत्न मनापासून आहेत मग..
किमान एक "तरी" मिळावी..!
स्वप्नात तशा खूप भेटतात..
कधीतरी "खरी" मिळावी..
हवीहवीशी एक जखम..
एकदातरी "उरी" मिळावी..!!
गालावर खळी नको तिच्या..
फक्त जरा "हासरी" मिळावी..!
चंद्राइतकी सुंदर नकोच..
फक्त जरा "लाजरी" मिळावी..!!
मी कुठे म्हणालो "परी" मिळावी..
एवढच की जरा "बरी" मिळावी..!!
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांन पेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते फक्त आणि फक्त
तुझ्यासाठी .
ती एक नाजुकशी कळी जी माझ्या जीवनात आली,
ती एक गोजिरी जी मनाला सुखावत राहिली,
ती एक मनमोहिनी जिची ओढ मनाला लागली,
ती एक अप्सरा जी सौंदर्याने मला भुलवत राहिली,

तिची नजर मला नेहमी खुणावत राहते,
तिच्या गालांची लाली नजरेत भरत राहते,
तिला पाहण्यातच सगळी वेळ निघून जाते,
अन जे बोलायचे असते ते मनातच राहून जाते,

तिची भेट म्हणजे ग्रीष्मातल्या धरणीवर पावसाची सर,
तिचा मधुर आवाज ऐकून मनाला जणू येतो वसंतातला बहर,
तिच्या हसऱ्या चेहऱ्याने जणू मनावर होतो जादुई असर,
ती एकटीच भरून काढू शकते माझ्या जीवनातली सर्व कसर.…
काय सांगू मी कळेना मजला
शांत सागरी वादळ हे उडाले
सागर तीरी कुणी लाविला गळा
मी मासा लाविता फूस अडकलो गळा
कुणीतरी चोरुनी नेले मज मना
उमजेना काही प्रीत अशी जडली कुणा?
मम कोरड्या मनी कोण आलं
आसुरलेला मीही मन तिकडे धावलं धावलं
तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात

भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी

पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?

नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण

खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार

माझी मैत्रीण..

माझी मैत्रीण..

तू नव्हतीस तेव्हा,
कविताच माझी मैत्रीण होती,
रक्ताच नव्हतं नात कोणतं,
तरीही माझ्या रक्तात ती वाहत होती..

तू आलीस अन शब्दांना,
परीसाचा स्पर्श लाभला,
तुझ्यावर लिहिताना गजल,
भावनांना नवा हर्ष लाभला..

तुझ्यावर लिहित गेलो,
अन तुझ्या प्रेमात पडलो,
तुझ्या काळजाचा विश्वात,
स्वत:लाच विसरून गेलो...

रोज शब्दातून तुला भेटयचो,
ओठातलं सारं काही नेहमी,
माझ्या कवितेतून थेट तुझ्या,
मनालाच सांगत रहायचो..

जेव्हा मला वाटलं होतं,
कि तुला डोळे भरून पहावं,
पण शब्दात जगणारा मी,
मुखवट्यातूनच आपलं जगणं असावं..
-Avi

अशी गोड तू.

अशी गोड तू.

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू
अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू
ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू
जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू
दिल्या या मनाला सुगंधी सखे तू
यातना,व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

अशी असावी माझी प्रेयसी


अशी असावी माझी प्रेयसी


♥♥♥ ... अशी असावी माझी प्रेयसी... ♥♥♥

थोडी लाजरी,

गोड हसरी,

नव्या गंधाने,

नव्या रंगाने,

कोमल कळीसारखी,

आयुष्य उमलवणारी...!!!

डोळ्यामध्ये तिच्या,

असावा तो ओलावा,

प्रेमामध्ये जीच्या,

मला चिंब भिजवीणारा...!!!

स्वर्गीय असावा,

सहवास तिचा असा,

की कधीही न संपणारा;

मला तिच्यात नि तिला माझ्यात,

बेधुंदिने सदैव गुंतून ठेवणारा...!!!

!! Asich asavi majhi preyashi !!

अशिच येशिल तु तेव्हा.

सोना.......


अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....
...


अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......तुझा BS

अबोल.

तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले
अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे
दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या
मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा
तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?
कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला ?



ती आणि पाउस

ती होती तेव्हा
पाउस असायच्या..
तीच्या दोन ओठांवरओलसर हसायचा…

तिच्या आधी पाउस
भर दुपार कट्ट्यावर..
कपाळी रुमाल पट्ट्यावर..
चिखलभर खेळायचा
दोस्तांमागे पळायचा

तिच्या सोबत पाउस
लख-लखणा-या लाख वीजा..
इवले अंतर अन नंतर
अंतरातुनी भय वजा…

ती नसताना पाउस
पानांवर साचतो..
जुनी कविता वाचतो..
समोर खिडकी काचेवरुन
थेंब थेंब ओघळतो..

ती नाही तर ….
नुसतंच पाणी..
लोकलच्या दारावर
ऑफ़िसच्या काचांवर
ओघळत रहातं..
वाहत जातं…
.
.
कुठुन येत..?
.
.
कुठे जातं?
…..

या मेघावर.....

या मेघावर त्या मेघाची, ही लखलखणारी खुण
रुसल्यानंतर हळु वेच तु, आभाळमुठीतुन उन…!!

स्मरणयुगांचे सुन्न पहारे असतील येथले मागे
कुणी या चाफ्याच्याखाली, कुणी त्या शपथांवर जागे..!!

तळहातावर घे हलका तु, शुभ्र पिसांचा श्वास
हलकी  फुंकर, मिटल्या डोळा पंख लागले भास..!!

मग तु वा-यावर अन मागावर पदरसावल्या पांघर
आभाळ उचलते उरलीसुरली पिसे उन्हाची भरभर…!!

तु गेल्यावर, या काठाला मुद्दाम सुचतसे पाणी
ओंजळभरुन तुला पाहता अलगद निसटती गाणी..!!