तुमचं काय गेलं ?
याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात
बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन
अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे
फूल होऊन पेटला
बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन
अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे
फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की
पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी
इतकं गरम झालं ?
पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी
इतकं गरम झालं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी
वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की
फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी
वेगळं काय केलं ?
फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी
वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच
टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
त्यांच चालणारच
टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे
परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला
जवळ ओढून घेणारच
परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला
जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की
व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं
त्याने थोडंच उचलून नेलं ?
व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं
त्याने थोडंच उचलून नेलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
– मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment