Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

सवय आहे

सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसताना ही...
सवय...
आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसता नाही...
सवय...
आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय...
आहे...
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसताना ही...
सवय..
आहे...
मन मारून झोपण्याची...
झोप येणार नसताना ही...
सवय...
आहे...
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...

मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता

तुमचं काय गेलं ?
याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात
बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन
अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे
फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की
पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी
इतकं गरम झालं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी
वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की
फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी
वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच
टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे
परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला
जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की
व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं
त्याने थोडंच उचलून नेलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
– मंगेश पाडगावकर
क्षणात एका टोचलेलं
खोल दरीत पोहोचलेलं
तिथेच डुंबत बसलेलं
न बोलता रुसलेलं
ओठात कधी मिटलेलं
कागदास कधी भेटलेलं
पापणीच्या आड हसलेलं
मनात माझ्या वसलेलं
उशीच्या कुशीत निजलेलं
स्वप्नाळु जगात सजलेलं
असून सुद्धा नसलेलं
पण आरशात मात्र दिसलेलं
न सापडलेलं प्रेम...
ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो
कळतय मला
कळतय मला हास्यात तुझ्या
काय लपून बसलय
घाबरु नको मी ही मनात
तसच काहीसं जपलय
न संपण्यार्‍या गप्पांचं मी
पांघरुण घेऊन निजते
तुझी हुशारी उत्तरात नाही
प्रश्नांमध्ये दिसते
आत्मविश्वासाने नटलेला
स्वभाव मोहक रहस्यमय
सारखा तुझा उल्लेख ओठी
हवीहवीशी तुझी सवय
विश्वासार्ह न्यायबुद्धी
वर्तनातही सभ्यता
हात तुझ्या हाती देता
मनी लाभली शांतता
आरशाने पहिल्यांदा माझ्या
डोळ्यात भरले काजळ
नव्हती ही झुळुक मैत्रीची
होते प्रेमाचे वादळ

वाट पाहतोय........

वाट पाहतोय अल्लड क्षणांची
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची 
न उमगलेल्या अनामिक नात्याची
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची

वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची
 नितांत बडबडनारे होठ पाहण्यची

वाट पाहतोय  माझी होण्याची
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची
अनामिक्तेला एक नाव देण्याची
फक्त तुझाच होऊन जाण्यची

आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
 आता फक्त वाट पाहतोय.

पाहिलंय का ? असं प्रेमं ..........

या जगाचं जेवढं
आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच
जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला
वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज
कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं
इतकं कुणी फसवलं नसेल
खंर प्रेम कळत असूनही
इतकं कुणी रडवलं नसेल
केसांचा अंबाडा घालून
इतकं कुणी गुंतवल नसेल
कायमच मन अडकेल
असं जाळ कुणी टाकलं नसेल
फक्त एका कटाक्षात
इतकं कुणी जाळलं नसेल
माझ्यासारखी भुरळ पडून
कुणी कुणाचा झाला नसेल
कुणी कुणाला आजवर
इतकं झपाटलं नसेल
कुणाचंच अस्तित्व इतकं
कुणात विरघळल नसेल
कुठल्याही स्वार्थाविना
कुणाचच प्रेमं फुललं नसेल
स्वतः जळून प्रियेला
इतकं कुणी जपलं नसेल
कधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे
हे पूर्ण माहित असूनही
कुणी कुणावर इतकं
प्रेमं केलं नसेल 

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही...
*********************************************************

आठवण येत आहे !!

आज तुझी खुप आठवण येत आहे...
 नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात,
 पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर,
त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो,
 तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला.
 अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात,
पण.......पण....अश्रु येत नाही..
 ************************************************************

आठवणी...

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल 
*********************************************************
आठवणीच्या सागरात..................
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही,

अमावस्येच्या रात्रि चंद्र कधी दीसत नाही,

कितीही जगले कुणी कुणासाठी,

कुणीच कुणासाठी मरत नाही.

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,

पण नशिबाचे चक्र थांबत नाही.

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,

त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही...
************************************************************

आठवणीत जागू दे.

कधीतरी तुझ्या डोळ्यांना माझ्या आठवणीत जागू दे...
कधीतरी तुझ्या मनाला त्याच्या मनाने वागू दे...

आनंदाश्रू असताना जे अमृतासारखे वाहतात...
तेच अश्रु दु:खामध्ये विष बनू पाहतात...
 
डोकं एकदा तापलं की तुझासुद्धा राग येतो...
पण या क्षणिक रागामध्ये प्रेमाचाच भाग येतो...

तुझ्यासोबत खेळताना मी हरण्यासाठीच खेळत गेलो...
जिंकण्याकडे दुर्लक्ष करून मी मैत्रीचे नियम पाळत गेलो...

गुलाबाच्या फुलासोबत किमान एकतरी काटा असतो...
'त्या' नाजुक फुलाच्या संरक्षणात त्याचा सिंहाचा वाटा असतो...

असं प्रेम करावं..

असं प्रेम करावं..

असं प्रेम करावं थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं... गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन"अगं"चा"अरे"करावं
असं प्रेम करावं जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं, असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं, असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं, पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील, पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ...
असं प्रेम करावं..

कितीक तु.................

कितीक तु.................
कितीक तु, कितीक मी, कितीकशा अश्या कथा
कल कि शाम थी यही, अब आज ‘शाम’ लापता..॥
खोजता चला चलु, तो यह परछाई क्यो जले ?
तरी बरे…,तु ठेवलीस ही नभावरी निळी फ़ुले…॥
ए आठवते का रुसताना, तुझेही व्हायचे असे ?
तब जलती थी खामोशी, अब चलती भी दुरसे..॥
तभी से मुंतिजर सूर, इन बेलिबास शाखं पर
भर पाचोळा गुण-गुण दिलीस तू हाक जर…॥
तशी अजुन बांधीलच या वा-याला ’ती’ शपथ
तु मिले न भी मिले तो करे चांदसे दस्तखत…॥
तु नही तो ये आसमां तेरी ये शाम लिख चला
तुझ्याशिवाय लिहिणेही, अजुन चालते तुला?…॥
होती तनहाई सिंदुरी, उसकी भी क्या खता
कितीक तु, कितीक मी, कितीकशा अश्या कथा…॥

नेहमीच वाटतं मला

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या ओठावरले ते ' अमृतकण '
माझ्या ओठांनी अलगद टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सहवासाने तुझ्या मग
माझ्यात बारा हत्तीचं बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माळलेल्या मोग-याने
मग बेधुंद दरवळाव..

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा
तुझ्या डोळ्यात सजवावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चुकलेल्या हुकलेल्या क्षणांना
पुन्हा एकवार जगावं 

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
भारलेल्या या क्षणांना
मी निरंतर जपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझं माझं गुपित तू
नजरेनं उलगडावं.

नेहमीच मला वाटतं
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रत्येक सुखाशी
तुझं नातं असावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
घड्याळाच्या काट्याने मग
त्याच क्षणावर थांबावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या जवळ असण्यानं
माझ्या प्रयत्नाना बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सोबतीने तुझ्या सखे
प्रेमाचं हे गौरीशंकर गाठावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दिव्यांच्या प्रकाशात
तुझं तेजोमय रूप बघावं 

प्रेमात पडलं की असच व्हायचं !!!

माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर...
सोडून मला जाऊ नकोस...

खुप स्वप्न बघितलित.....
तोडून कधी जाऊ नकोस....

कधी प्रेम करायचीस माझ्यावर...
हे कधी विसरु नकोस.....

नको करूस प्रेम...
तिरस्कार मात्र करू नकोस...

विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....
मैत्री माझी विसरु नकोस.....

सोडून गेलीस तू मला....
प्रेम माझ विसरु नकोस...

मरणाच्या वाटेवर असताना...
कालजी माझी करू नकोस...

मरण जरी आल मला....
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..

प्रेम करायचं राहुन गेलं

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,


पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!...


पण ते कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे..
नंतर विचार आला अजुन लग्नाला 5 वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
पण काय करु आता कुणी भेटतच नाही


- अविनाश घडशी (Avinash Ghadshi).