Showing posts with label मराठमोल्या चारोळ्या.. Show all posts
Showing posts with label मराठमोल्या चारोळ्या.. Show all posts
१) फूलपाखरू तू,
तुला मुक्त करायचय,
स्वच्छंदी आयुष्य तुझ,
तुला परत द्यायचय !
२) माझ्यावरचा तुझा अधिकार,
आता मलाही नकोय,
श्वासंवरचा हा भार,
आता मलाही नकोय !
३) पुन्हा पुन्हा सांगाव तुला,
तू आता माझ्या मनात नाहीस,
आता मी तुला,
कशातच शोधत नाही !
४) जाता जाता तू,
एक कम करून गेलास,
कवितेच दान माझ्या,
ओंजळीत टाकुन गेलास !
५) नात तुटताना,
यातना होतातच,
पण मग त्या यातानानाच,
आपण आयुष्याचा आधार बनवल तर ?
६) तुझ्या आठवणी,
सदैव सोबत राहतील,
आयुष्य जगायला,
बळ देत राहतील !
७) तुझ प्रत्येक म्हणन ऐकल,
तुझ्यासाठी जगणच टाळल,
तुला दिलेल प्रत्येक वचन पाळल,
अगदी तुला विसरायचेही !
8)
तुझ्या विरहाचे स्वप्न.....
मला काल रात्री पडले होते...
पण ते लगेचच खरे होइल....
असे मुळीच वाटले नव्हते...

9)
तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत...
मी सारी रात्र जागलो होतो...
तुझ्या होकारानंतर..
आईशप्पथ एक रात्र ही झोपलो नव्हतो..


10)
तुझ्याशी बोलत असताना..
न जाणे कसा काय वेळ निघून जातो...
भूक तर दुरच...
झोपेलाही विसरून जातो.....

11)
तुझा सुन्दर चेहरा...
मला वेड लावून जातो....
तुझा काय???
सम्पूर्ण वेळ माझा तुझ्याकडे बघण्यात जातो...

12)
तू सोडून जाशील...
अस स्वप्न मला एकदा पडल होतं...
इतर स्वप्न सोडून...
तेच स्वप्न खर व्ह्हाव होतं??

13)
तुझ्या सोबत पुढील आयुष्याची..
स्वप्न पाहून झाली होती...
तू गेल्यानंतर...
ती स्वप्न अश्रुंसोबत वाहून गेली होती...

14)
तुला एकदा पहायला मी....
कित्ती कित्ती तडफाडायचों...
उन पावसाची पर्वा न करता..
मी तिथे त्या कोप्र्यात उभा असायचो..

15)
माझ्या प्रेमाची तुलना..
कधी कशाशिही करू नकोस..
नको करूस प्रेम पण ..
ह्या वेड्याच नाव कधी विसरु नकोस...

16)
किती छान असत ना जर..
स्वप्नांच्या जगात राहता आल असत..
आपल्या स्वप्नाना...
तिथे तरी पूर्ण करता आलं असत..

मराठमोल्या चारोळ्या.

पाऊस पडून गेलाय
मौसम सांद्र आहे ...
आता सांगावेसे वाटतेय
की तू माझा चंद्र आहे !!!
*************************
"खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!"
*************************
"या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा .....
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!"
*************************
लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही ....
कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही !!!

*************************
"आपण घालवलेला एकही क्षण
विसरायला सांगू नकोस ......
तुला विसरनारे असतिलही
त्यात मला मोजू नकोस !!!"

*************************
"हळूच चालत तुझ्या रूपाने
नशीब येईन दारी ...
मला न कळता अशी अचानक
घडेन किमया सारी "

*************************
"मला विसरण्याची तुझी

सवय जुनी आहे .....

तुझ्या आठवणीत माझी

रात्र सुनी आहे !!!!"

**************************
अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसर्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही

**************************
"नुसता कुणाला सांगता यावा
म्हणून तुझा विरह जपत नाही ...

दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड
मला दुसरे नावही खपत नाही .....
***************************
"माझ्या प्रेमाचा थांग पाहण्याचा प्रयत्न करू नकोस
मेलो तरी तुझ्या हाकेला 'ओ' देत राहीन...
जर तुला प्रणयास पाऊस हवा असेन
मी श्रावणास माझे अश्रू उसने देईन !!!"
****************************
मला वेड लागलय
हा दावाच तकलादू आहे
मी वेड्यासारखा वागतोय
ही तर प्रेमाची जादू आहे !!!