जरा मालवित उन
उन्हाचे मौन
येतसे सांज..!!
जराच सारुन मेघ
ओढली रेघ
…असा अंदाज..!!
संन्यस्त असावी वेळ
मंतरली ओळ
दिव्यशी काय़ा..!!
तिच्याच हाती शाल
रंग गुलाल
नभावार माया..!!
हा लिहिताना एकांत
होतसा शांत
तळ्यावर वारा
अन पाण्याचे अंग
आणते सोंग
’नको’ शहारा…!!
अशात व्हावे शुन्य
कळावे पुण्य
असेही घडते..!!
तरी असावा शाप
जुनेसे पाप
’धन्य’ सापडते..!!
तेच शोधते कूळ
साचते धूळ
उधळशी माती…!!
सावळी जाग
कुणाचा माग ?
बिलगशी भीती…!!
या समयी अंधारात
कळ्यांची वात
निरांजन ठेव…!!
भय-भरल्या अंगणात
खुळे फ़िरतात
फ़ुलांचे देव …!!
No comments:
Post a Comment