नवरा-बायकोच्या नात्यांची कविता

सुंदर कविता...................

नवरा-बायकोच्या नात्यांची
अलगद गुंफण करणारी कविता
काल वाचनात आली.

❤तो तिला म्हणाला “डोळ्यात
तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल,
थांबा जरा राहू दे”

💙तो म्हणाला “काय बिघडेल
स्वयंपाक नाही केला तर?
”ती म्हणाली ” आई रागावतील,
दूध उतू गेल तर?”

👪“ठीक आहे मग दुपारी
फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून,
पाणी यायची तीच वेळ”

💑“बर मग संध्याकाळी आपण
दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात,
सगळेजण घरीच जेवू”

💌“तुझ्यामुळे गेली माझी चांगली
सुट्टी फुकट”
“बघा तुमच्या नादामधे
भाजी झाली तिखट”

💏आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा
माजघरातून मुसमुस

💔सिगरेट पेटवत, एकटाच तो
निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून

💓दमला भागला दिवस संपला
तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून
दोघांनाही कळेना

💕नीट असलेली चादर त्याने
उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या
उशाजवळ ठेवून दिली।

💖तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?”
आणि तो विरघळला।

💗“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल
केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून
किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

💚“माझी सिगरेट जळताना तुझ
जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव
जाळण आठवल

💙अपेक्षांच ओझ तू किती
सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख
तळहातावर झेललस…

💛तुला नाही का वाटत कधी
मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा
तुझ्या जगात जावस?”

💜“बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…

💘माप ओलांडून आले होते,
तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का
विरघळलं?”

सर्व नवरा - बायको साठी
आवडली तर नक्की पुढे पाठवा .......


Related Post Marathi Kavita

नको होतो ना मी तुला

नको होतो ना
मी तुला,
मग तसं मला सांगायच होतं...
कारण
,तुझं प्रेम माझ्यावर नसलं तरी,
माझं तुझ्यावर खुप प्रेम होतं...
वेड्यासारखा नकळत न सांगता,
प्रेम करत होतो मी तुझ्यावर...
जे तुला कळून ही,कधीच कळल नव्हतं...
मी तुझा कोण लागत नाही,
हे अगोदरच मला समजलं होतं...
तरीही माझा मुर्ख पणाच अडला मला,
माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं...
कारण,
मला एकदातरी समजुन घेणं,
तुलाकधीच जमलं नव्हतं...!

सवय आहे

सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसताना ही...
सवय...
आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसता नाही...
सवय...
आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय...
आहे...
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसताना ही...
सवय..
आहे...
मन मारून झोपण्याची...
झोप येणार नसताना ही...
सवय...
आहे...
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...

फक्त एकदाचं....

फक्त एकदाचं तुला मनसोक्त हसताना पहायचयं
निदान त्यासाठी तरी मला जोकर बनुन

तुझयासमोर यायचयं
फक्त एकदाचं तुझया मनातलं सारं काही जाणुन
घ्यायचयं
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन
तासनतास बसायचयं
फक्त एकदाचं तुझया मऊशार केसातुन हात
फिरवायचायं
निदान
त्यासाठी तरी एखादा गजरा तुझया केसात
लावयचायं
फक्त एकदाचं तुला माझयासाठी बेचैन
होताना पहायचयं
निदान
त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा
जायचयं
फक्त एकदाचं तुला अनिवार रडताना पहायचयं
निदान त्यासाठी तरी मला एकदा खोटं खोटं
मरायचयं....

आयुष्य थोडसच असावं पण..

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,

आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...

कविता

कविता शब्द गेला गाळून गळून
वापरून केला चपटा
कॅरमचा स्ट्राईकर सारखा
कविता गोची करत नाही
छळाचे माध्यम म्हणून
ती मूड निर्माण करत नाही
म्हणून खलास करा तिला.
तुमच्या मुडचा परिणाम टांगा
तिला आलेल्या पोकावर.
तुमच्या भावना सख्ख्या आईसारख्या
राहिल्या नाहीत कवितेवर
बोनससाठी केलेल्या संपामध्ये
जर तुम्ही भारावलेले असता
तर मग कवित अजून किती भारावणार?
जगण्याचे सारे प्रश्न मरून पडलेत
नाक्यावर.
आतातरी आपल्या सवयीच्या
कवितेला वहा श्रद्धांजली
आणि या एक पर्यायी शब्द
जो उठेल ताठरता देईल
काही क्षणांची तरी.

या वयात सुद्धा

काही ओळी ....
४०+ मित्र व मैत्रिणींसाठी :
:
" या वयात सुद्धा "
:
" कुणालाही हरवावं,
सहज पळता पळता ...
कुणीही थक्क व्हावं,
पाहून आपली ..
चपळता ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
जगण्यातलं ताजेपण,
सहज दिसावं चेहऱ्यावर ...
कुणीही फिदा व्हावं,
सहज आपल्या ...
पेहरवावर ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
अहो तीच ती उमेद,
कृतीतून घडत रहावी ...
दिवसांगणिक जगण्यावर,
प्रीत हि ...
जडत रहावी ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
शरीराच्या थाटाला,
नको कुठे गालबोट ...
टी शर्ट मध्ये
मिरवावं,
नियंत्रणातलं पोट ...
आणि कुणी ..
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?

तरुण हृदयानं,
प्रेमात ...
पडत राहावं अनेकदा ...
साऱ्यांनाच वाटून जावं,
घोडा अजूनही ...
आहे उमदा ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
सुवर्ण असो वा ...
अमृतमहोत्सव,
वयाचा कुठलाही ...
असावा हुद्दा ...
आपण देताना ...
ठेवून द्यावा,
पंचविशीतलाच गुद्दा ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा? ...
या वयात सुद्धा ? "


फक्त हिमतीने लढ

घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज  ?
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ....!
If u like,pls share.

मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता

तुमचं काय गेलं ?
याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात
बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन
अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे
फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की
पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी
इतकं गरम झालं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी
वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की
फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी
वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच
टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे
परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला
जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की
व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं
त्याने थोडंच उचलून नेलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?
– मंगेश पाडगावकर

खरा श्रीमंत

कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!

     मी आहे तरच सर्व आहे...,
     नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

    प्रेमाने जोडलेली चार माणसं व
    त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!