या वयात सुद्धा

काही ओळी ....
४०+ मित्र व मैत्रिणींसाठी :
:
" या वयात सुद्धा "
:
" कुणालाही हरवावं,
सहज पळता पळता ...
कुणीही थक्क व्हावं,
पाहून आपली ..
चपळता ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
जगण्यातलं ताजेपण,
सहज दिसावं चेहऱ्यावर ...
कुणीही फिदा व्हावं,
सहज आपल्या ...
पेहरवावर ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
अहो तीच ती उमेद,
कृतीतून घडत रहावी ...
दिवसांगणिक जगण्यावर,
प्रीत हि ...
जडत रहावी ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
शरीराच्या थाटाला,
नको कुठे गालबोट ...
टी शर्ट मध्ये
मिरवावं,
नियंत्रणातलं पोट ...
आणि कुणी ..
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?

तरुण हृदयानं,
प्रेमात ...
पडत राहावं अनेकदा ...
साऱ्यांनाच वाटून जावं,
घोडा अजूनही ...
आहे उमदा ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा?
सुवर्ण असो वा ...
अमृतमहोत्सव,
वयाचा कुठलाही ...
असावा हुद्दा ...
आपण देताना ...
ठेवून द्यावा,
पंचविशीतलाच गुद्दा ...
आणि कुणी ...
सहज म्हणावं,
:
या वयात सुद्धा? ...
या वयात सुद्धा ? "


No comments:

Post a Comment