नामवंत चित्रकार चंद्रकला कदम
यांच्याकडून आलेल्या ओळी..
👇 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
स्रिया नवरात्रीत सरड्याप्रमाणे रंग बदलतील असा मेसेज वाचला आणि कसेसेच वाटले.
त्यातूनच ही कविता तयार झाली.
🔅🔅🔅🔅🔅🔅
🔅🔅रंग स्रीचा🔅🔅
कोण म्हणते स्री ही रंग बदलते
अरे, तुझ्याच रंगात ती स्वतःस मिसळते
आवड तिला कोणत्याही रंगांची नसते
तुझ्यासाठी अस्तित्व ती सहज विसरते
कुंकुम लाल लावून भाळी तुलाच मिरवते
निळाईची शाल तुझ्या दोषांस लपवते
तेजस्विता पिवळी तिची अर्थार्जन करते
बीज अंकुरून तुझे हिरवी धरती होते
अत्याचार होताच पहा किती काळवंडते
भगवी वस्रे लेवून सतत परित्याग करते
जराशा अपमानाने पांढरी फटक पडते
लाज शरमेने ती गुलाबी होते
जांभळा रंग समृध्दीचा तुलाच देऊन जाते
नवरंगांची उधळण निरंतर तुझ्या जीवनी करते
आणि
तू मात्र म्हणतोस, ती सरड्याप्रमाणे रंग बदलते.
No comments:
Post a Comment