आयुष्य

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,




*******************************************************************



अजुन काय हवे असते

एकच चहा, तो पण कटींग...

एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...

एकच साद, ती पण मनापासुन...

अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून




एकच कटाक्श, तो पण हळूच...

एकच होकार, तो पण लाजून...

एकच स्पर्श, तो पण थरथरून...

अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून




एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून....

एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...

एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...

अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून




एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...

एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...

एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..

अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.




एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...

एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...

एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...

अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून




सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...

स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...

फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..

अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

**********************************************************
अजुनही आहे.




अजुनही........




अजुनही मनातून, तुझी छबि हटत नाही,

तू गेलास तरी, मी मात्र रडत नाही !




अजुनही माझ्याभोवती, तू वावरतोस,

तुझा स्पर्श हवेतून, अजुनही जाणवत आहे !




अजुनही आपली, मिलने आठवते,

भर पावसातही तरी, मी कोरडीच राहते !




अजुनही मी तुझीच आहे, अजुनही मनाला तुझीच ओढ़ आहे,

तू नक्की परत येशील, अशी खात्री या वेडीला,

अजुनही आहे !!

****************************************************************
आयुष्य असचं जगायचं असतं.


जे घडेल ते सहन करायचे असतं,


बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं..

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी,


कुठतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,


स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं
आयुष्य असचं जगायचं असतं..

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं,


हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,


आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी


मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं,


पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कसे धन्यवाद देऊ तुला..
आयुष्य असचं जगायचं असतं..


*****************************************************************
आयुष्य साधं सोपं जगायचं.


साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं

प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण

जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण

करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते

आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते

झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात

आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं

जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं!

आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्यसाधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं

No comments:

Post a Comment